ताज्या घडामोडी

प्रहार जनशक्ती पक्ष वतिने मंजरथ रस्त्यावर पालोपाचोळ्याने खड्डे बूजुन बेशरमीचे झाडे लावून आंदोलन केले

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या पुर्वे कडून शासकीय धान्यांच्या गोडाऊन पासुन जाणारा माजलगाव ते मंजरथ हा पक्का रस्ता हा गेल्या तीस,पस्तीस वर्षा पुर्वीचा असुन हाच तालुक्यातील मनुर,मनुरवाडी, डेपेगाव,लुखेगाव, गोविंदपुर, सांडसचिंचोली ,आळसेवाडी, मंजरथ या गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. याच रस्त्याने शासनाकडून तिर्थक्षेत्र म्हणून मनूर येथील रेणूका देवी व मंजरथ येथील प्रसिद्ध दक्षिण काशी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. परंतु जवळपास गेल्या दहावर्षा पासुन यारस्त्याची जि.प.बांधकाम विभागाकडून दुरुस्ती अथवा देखरेख झाली नसल्याने अनेक ठिकाणी रस्ता खचून गेला आहे आणि त्यावर के.जी.दालमील च्या जवळ असलेल्या मोठ्या नाल्यावरील पुल खराब व कमी उंचीचा असल्याने चारचाकी वाहनांना त्यावरून येणे जाणे धोकादायक झाले आहे. तसेच त्याच्या नाल्यातील घाण पाणी आजुबाजुला असलेल्या नागरीवस्ती मध्ये घुसत असल्याने त्याभागातील नागरिकांच्या आरोग्यास रोगराई चे निमंत्रण देण्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. साधरील पुल अंरुध आहे पण संरक्षण कडे पण नाही त्याठिकाणी बेशरमीचे झाडे लावून आंदोलन केले प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने, गोपाल पैंजने, अविनाश ढगे, अशोक अर्जुन, मुस्ताक कुरेशी,संघर्ष प्रतिष्ठान चेअशोक ढंगे, आझम कुरेशी, शाहनवाज कुरेशी, जावेद कुरेशी, उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close