ताज्या घडामोडी

झाडे कुटुंबाच्या न्यायाकरीता काँग्रेस कमिटीकडून चिमुर पोलीस स्टेशनला निवेदन

मुख्य संपादक:कु समिधा भैसारे

चिमूर तालुक्यातील नवेगाव पेठ येथील नितेश दयाराम झाडे वय ४२ वर्ष ही व्यक्ती दिनांक – १४/१०/२०२२ पासून बेपत्ता असल्याची माहिती वृत्त पत्राद्वारे प्रकाशित करण्यात आली होती.
मात्र गेल्या चार दिवसानंतर बेपत्ता असलेल्या नितेश दयाराम झाडे यांचे प्रेत गावालागत असलेल्या नाल्यात कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. ज्या परस्थितीत प्रेत आढळून आले त्या परस्थितीचा विचार करता हा घात पात असल्याचा संशय निर्माण होत असून अतिशीघ्र योग्य ती तपास यंत्रणा मार्गी लाऊन दोषी असलेल्या व्यक्तीवर कडक ती कार्यवाही करून त्यांच्या कुटुंबास न्याय मिळावा या हेतूने तालुका व शहर कांग्रेस कमिटी चिमूर यांच्या द्वारे पोलीस स्टेशन चिमूर येथे निवेदन देण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close