कोंढाळा गावातील शेतकऱ्याचा उपराष्ट्रपती च्या हस्ते सन्मान
वरोरा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत शेती करणाऱ्या वरोरा तालुक्यातील कोंढाळा गावातील प्रगतशील कापूस उत्पादक शेतकरी भानुदास बोधाने यांना दिल्ली येथे उप राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या शेतकऱ्याने पारस ऍग्रो इंडस्ट्रीज आणि इंडो काउंट या उद्योगाद्वारे चालविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करून कापूस उत्पादनात विक्रमी वाढ केली. त्यांच्या या कार्याची दखल केंद्रीय स्तरावर घेतली आणि केंद्र सरकारच्या सी आय टी आय तसेच सीडीआरए या केंद्रीय संस्थेद्वारे त्यांना सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील विज्ञान भवनात भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ेशातील प्रगत शेतकर्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होम कान्फेडरेशन आफ इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्री कॉटन डेव्हलपमेंट अंड रिसर्च असोसिएशन तसेच सिडीआर ए च्या वतीने हा सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी की केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना विक्रम जरदोष या उपस्थित होत्या. पुरस्काराबद्दल आपल्याला अत्यानंद झाला असुन आपण आत्मसात केलेल्या ज्ञानाचा आणि संशोधन तंत्राचा उपयोग यापुढे शेतकऱ्यांकरिता करणार असल्याचे कोंढाळा येथील प्रगतशील शेतकरी भानुदास बोधाने हे प्रतिनिधी शी बोलतांना म्हणाले.