ताज्या घडामोडी

पशुवैद्यकीय दवाखाना विठ्ठलवाडा येथे जनावरांना लागण झालेल्या चौखूरा रोगाच्या नियंत्रनासाठी शिबीराचे आयोजन करा

ग्रामपंचायतिच्या वतीने तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांना दिले निवेदन.

तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी

तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील बऱ्याच पाळीव जनावरांना चौखूरा रोगाची लागण झाली आहे.त्यामुळे पशु वैद्यकीय दवाखाना विठ्ठलवाडा येथे चौखुरा रोग नियंत्रनासाठी शिबीराचे आयोजन करण्यात यावे या करिता दि.4 मार्च रोज शुक्रवारला ग्रामपंचायत विठ्ठलवाडा च्या पदाधिकार्यांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. विठ्ठलवाडा गावात पशुपालक वर्ग मोठ्या प्रमाणात असून गाय,बैल,म्हैस,शेळी,मेंढी या पाळीव जनावरांचे पालन येथील पशुपालक करित आहेत.
अश्यातच मागील काही दिवसापासून या पाळीव जनावरांना चौखूरा रोगाची लागण झाल्याने पशुपालक वर्ग वैतागला आहे. पशु वैद्यकीय दवाखान्यात जनावरांना उपचाराकरिता दाखल केले असता पुरेसा औषधसाठा उपलब्ध राहत नसल्याचे येथील पशु वैद्यक सांगत असल्याने
जनावरावर उपचार करायचा कसा असा यक्ष प्रश्न येथील पशुपालकांना पडला असता त्यांनी सदर समस्या विठ्ठलवाडा ग्रामपंचायतीपुढे मांडली.लागलीच सरपंच अंकुर मल्लेलवार यांनी
दि.4 मार्च रोज शुक्रवारला विठ्ठलवाडा येथे जनावरांना लागण झालेल्या चौखुरा रोगाच्या निवारनासाठी शिबीर लावण्यात यावा या संदर्भात तालुका पशुवैद्यकीय अधिकारी गोंडपीपरी यांना निवेदन दिले.
यावेळी निवेदन देताना विठ्ठलवाडा ग्रामपंचायत सरपंच अंकुर मल्लेलवार, ग्रामपंचायत सदस्य विनोद मेश्राम यांची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close