चिमुर तालुका संजय गांधी निराधार योजनेची बैठक संम्पन
= 624 प्रकरनाना मंजूरी
तालुका प्रतिनिधी: मंगेश शेंडे चिमुर
संजयगांधी निराधार योजनेच्या प्रकरनाना मंजूरी देण्याच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच बैठक पार पडली, या बैठकीत श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्पकाळ योजना, संजय गांधी विधवा योजना व अपंग योजनच्या 624 प्रकरनाना मंजूरी देण्यात आली.
चिमुर तालुका संजय गांधी निराधार योजनेची बैठक समितीचे अध्यक्ष संजय डोंगरे यांचे अध्यक्षते खाली तहसीलदार तुलसीदास कोवे यांचे प्रमुख उपस्थित नुकतीच संम्पन झाली, या बैठकीत सर्व प्रकारच्या अरजाची तपासणी करण्यात आली, आवश्यकत्या कागदाची पूर्तता करणाऱ्या श्रावण बाळ योजने अंतर्गत 316 इंदिरा गांधी उर्धपकाल योजने अंतर्गत 140 संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 114, संजय गांधी विधवा व अपंग योजने अंतर्गत 54 प्रकरनाना मंजूरी देण्यात आली, अश्या ऐकून 624 प्रकरनाना मंजूरी देण्यात आली.
या बैठकिला तहसीलदार तुलसीदास कोवे, समितिचे अध्यक्ष संजय डोंगरे, राजू लोणारे, भाऊराव ठोम्बरे, सुनील दाभेकर, श्रीहरी सातपुते, स्वनील वासनिक, देवेंद्र गजभीए, जयप्रकाश गेडाम, अजय चौधरी, आदि उपस्थित होते.