ताज्या घडामोडी

नागभीड येथील महाविद्यालयांचे बेमुदत कामबंद आंदोलन

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

नागभिड महाविद्यालयीन महाराष्ट्र राज्य व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समीतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शासनास करुनही शासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे व आश्वासित प्रगती योजनेचा अन्यायकारक शासन निर्णय दि . ७ डिसेंबर २०१८ व १६ फेब्रुवारी २०१ ९ रद्द करून आश्वासित प्रगती योजना पूनर्जीवित करणे यासह अन्य मागण्यांसाठी १८ डिसेंबर पासून पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले . बेमुदत कामबंद आंदोलनला राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभीड व गोविंदराव वारजूकर कला व कॉमर्स महाविद्यालय , नागभीड या दोन्ही महाविद्यालयातील कर्मचारी यांनी सहभाग घेतला असून आंदोलन शिक्षकेतर स्थळाला दोन्ही महाविद्यालयाच अध्यक्ष , सचिव तसेच संस्था चे पदाधिकारी , प्राचार्य , प्राध्यापक तसेच विदर्भ अशासकीय महाविद्यालयीन कर्मचारी संघटना चे हुमेशजी काशीवर , सचिव , रुपेश चिंचोळे , उपाध्यक्ष व राजेश कायरकर , उपाध्यक्ष चंद्रपूर गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांनी आंदोलनला बेमुदत कामबंद सदिच्छा भेट दिली व शुभेच्छा दिल्या . तसेच पांडुरंगजी चौधरी , अध्यक्ष , गो . वा . महाविद्यालय कर्मचारी संघटना , नागभीड , नरेश देसाई , सचिव , प्रदीप मोहूर्ले , अध्यक्ष , रा . म . गांधी महाविद्यालय कर्मचारी संघटना , नागभीड व दोन्ही महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी सदस्य इत्यादींनी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभाग घेतला असून जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन संयुक्त कृती समीतीच्या मार्गदर्शनानुसार सुरूच ठेवणार आहोत असे अध्यक्षांनी कळविले आहे . न्याय मागण्याना पाठिंबा जाहीर करून शासनाने या रास्त मागण्यांची पूर्तता करावी असे सर्वतोपरी म व्यक्त केले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close