ताज्या घडामोडी

आज स्व नितिन महाविद्यालयात कोविड-१९ लसिकरण

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

वाघाळा येथील स्व.नितिन महाविद्यालयात वाघाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यां साठी कोविड-१९ चे लसिकरण करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ राम फुन्ने यांनी दिली.

कोविड-१९ चा प्रभाव कमी व्हावा या साठी जानेवारी महिण्या पासुन देशभर मोफत लसीकरण करण्यात येत आहे. मागिल दिड वर्षा पासून कॉलेज कट्टे विद्यार्थ्यां शिवाय सुनेसुने असून २० ऑक्टोबर पासून वरिष्ठ महाविद्यालय पुर्ववत सुरू झाले आहेत. संपुर्ण विद्यार्थ्यांचे लसिकरण व्हावे या साठी स्व नितिन महाविद्यालय आणि प्राथमिक आरोग्यकेंद्र वाघाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पोखर्णी रोड वरील महाविद्यालयाच्या नविन इमारती मध्ये हे लसीकरण करण्यात येणार आहे. या साठी महाविद्यालयात प्रवेशीत १८ वर्षा वरील सर्व विद्यार्थ्यांना कोविड-१९ लसिकरण बंधनकारक असून या साठी सर्वांनी बुधवार २७ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयात लसिकरण कॅम्प मध्ये सहभागी व्हावे या साठी विद्यार्थ्यांनी ओटीपी साठी मोबाईल फोन आणि आधार कार्ड सोबत आणावे सोबतच जेवण करून यावे असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ राम फुन्ने यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close