ताज्या घडामोडी

खासदार औद्योगिक महोत्सव नागपूर येथे आयोजित भूमीपूजन सोहळा थाटात संपन्न

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

नितीन गडकरींनी नव्‍या वर्षात दिली नवी दिशा – खा. अशोक नेते
‘खासदार औद्योग‍िक महोत्‍सव–अॅडव्हांटेज विदर्भ’च्‍या कार्यक्रम स्‍थळाचे थाटात भूम‍िपूजन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्रीडा महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून विदर्भातील चांगल्‍या खेळाडूंनी समोर आणले असून आता संपूर्ण देशात क्रीडा महोत्‍सवांचे आयोजन केले जात आहे. आता त्‍यांनी ‘खासदार औद्यागिक महोत्‍सव-अॅडव्‍हांटेज विदर्भ’च्‍या माध्‍यमातून विदर्भातील उद्योगांना प्रोत्‍साह‍ित करण्‍याचे महत्‍वाचे पाऊल उचलले आहे. नवीन वर्षात त्‍यांनी उद्योगांना या माध्‍यमातून नवी दिशा दिली असून त्‍यामुळे विदर्भात उद्योजक आणि युवकांमध्‍ये नवी चेतना निर्माण होईल, असा आशावाद गडचिरोली चिमूर लोकसभेचे खासदार अशोक ‌नेते यांनी व्‍यक्‍त केला.


पुढे बोलतांना खा.अशोक नेते यांनी गडचिरोली ज‍िल्‍ह्यात नैसर्गिक साधनसंपत्‍ती मुबलक प्रमाणात असून केवळ पायाभूत सुविधांच्‍या अभावामुळे येथे उद्योग येऊ शकले नाही, अशी खंत व्‍यक्‍त करताना अॅडव्‍हांटेज विदर्भचा लाभ गडचिरोली जिल्‍ह्याला म‍िळेल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.

केंद्रीय मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून आकाराला आलेल्‍या असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट (एड) च्‍या वतीने येत्‍या 27 ते 29 जानेवारी 2024 दरम्‍यान ‘खासदार औद्योग‍िक महोत्‍सव – अॅडव्‍हांटेज विदर्भ’ चे राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरात आयोजन होणार असून या महोत्‍सवाच्‍या स्‍थळाचे भूमिपूजन बुधवारी थाटात पार पडले.
याप्रसंगी वर्धेचे खा.रामदास तडस, रामटेकचे खा. कृपाल तुमाने, आ. मोहन मते यांच्यासह वर्ल्‍ड ट्रेड सेंटरचे अनुप खंडेलवाल, बैद्यनाथचे सुरेश शर्मा, शारदा इस्‍पात लि. चे नंदक‍िशोर सारडा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, माजी महापौर कल्‍पना पांडे, गोविंद देहडकर यांच्‍यासह औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्‍यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
खा. तडस म्‍हणाले, अशा औद्योगिक महोत्‍सवांची देशाला अधिक गरज असून त्‍यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि देशाची भरभराट होईल.खा. कृपाल तुमाने यांनी विदर्भात मोठ्या उद्योगांची गुंतवणूक वाढली तर उद्योग वाढतील आणि परिणामस्‍वरूप बेरोजगार युवकांच्‍या हाताला काम म‍िळेल. अॅडव्‍हांटेज विदर्भमध्‍ये त्‍यादृष्‍टीने प्रयत्‍न करावे, असा सल्‍ला दिला. डॉ. सुभाष चौधरी यांनी अध्‍यक्षीय भाषणातून नागपूर विद्यापीठाद्वारे कौशल्‍य विकासासाठी राबविण्‍यात येणा-या विविध प्रशिक्षणांची माहि‍ती दिली. एडचे अध्‍यक्ष आशीष काळे यांनी प्रास्‍ताविकातून व‍िदर्भातील सर्वांत मोठ्या अॅडव्‍हांटेज विदर्भ मध्‍ये आयोजित करण्‍यात येणा-या इंडस्ट्रियल एक्‍स्‍पो, बिझनेस आणि इन्‍व्‍हेस्‍टमेंट कॉन्‍क्‍लेव्‍हची माह‍िती दिली. सूत्रसंचालन सचिव डॉ. विजय शर्मा यांनी केले. राजेश बागडी यांनी आभार मानले.

अॅडव्‍हांटेज विदर्भच्‍या सफलतेसाठी एडचे उपाध्‍यक्ष प्रणव शर्मा व गिरधारी मंत्री, सदस्‍य राजेश रोकडे, निखिल गडकरी, डॉ. महेंद्र क्षिरसागर, प्रदीप माहेश्‍वरी, प्रशांत उगेमुगे व रवींद्र बोरटकर यांचे सहकार्य लाभत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close