@जिजाऊ ते सावित्री@ सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागांचा उपक्रम दिनांक 03 ते 12 जानें 2022
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पूर्णा तालुक्यातील फुलकळस केंद्रअंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडाळा येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने साजरा होत असलेल्या जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा सप्ताहांतर्गत समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फुलकळस केंद्राचे केंद्रप्रमुख मा.दयानंद स्वामी तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटराव जाधव, ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग मोरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात पदवीधर शिक्षक कैलास सुरवसे म्हणाले,”की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना विकास देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या समूहगीत गायन स्पर्धेत दोन गटांनी आपले सादरीकरण केली इयत्ता पहिली ते चौथी त्यांचा छोटा गट इयत्ता पाचवी ते आठवी यांचा मोठा गट विविध गीतांनी विद्यार्थ्यांनी सर्वांना भारावून टाकले. समूहगीत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी छोट्या गटात बाजी मारली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या कु. श्रुती अशोक शिंदे व शिवानी अंगद बेंडे हिने केले तर आभार ज्ञानेश्र्वर साखरे मानले अध्यक्षीय समारोप करताना केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणाले,”महाराष्ट्राच्या लेकींनी भारताला एक नवीन दिशा दिली आहे. कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून प्राध्यापक किशोर उघडे यांनी काम पाहिले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्येष्ठ शिक्षक ज्ञानेश्वर साखरे,प्रल्हाद राठोड, वर्षा काशिनाथ पाटील ,कैलास सुरवसे आणि राहुल काऊतकर आदींनी परिश्रम घेतले.