आजच्या तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन प्रयत्नवादी बनावे – प्रा. सुभाष ढगे

संभाजी ब्रिगेड परभणी आयोजित छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यात प्रतिवादन.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी येथील उघडा महादेव परिसरात आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त जाहीर व्याख्यान व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रा. सुभाष ढगे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि आजचा युवक या विषयावर बोलत असताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे जिवनचरित्र मांडताना संभाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे अनेक भाषांचे ज्ञान, संस्कृत भाषेवर असलेली पकड, आलेल्या अंतर्गत फितुरी व अनेक संकटांवर मात करत अजिंक्य राहिलेले संभाजी महाराज अशा विविध विषयावर तरुणांना मार्गदर्शन केले त्या प्रसंगी अध्यक्षस्थानी शिक्षणाधीकारी प्राथमिक मा. विठ्ठल भुसारे उपस्थित होते. उदघाटक म्हणून सहाय्यक निबंधक नानासाहेब कदम तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी जिल्हापरिषद सदस्य स्वराजसिंह परिहार व पी. बी. लांब कार्यकारी अभियंता जायकवाडी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अनिताताई सरोदे, रुस्तुम भालेराव, बी. टी. पौळ, सुधाकर गायकवाड, नरहरी वाघ, बाळासाहेब यादव, विठ्ठल घुले, जोगदंड साहेब, ठोंबरे साहेब, पानपट्टे मॅडम,मुगजी बुरूड डॉक्टर विजय बोंडे, किशोर रन्हेर, दिलीप श्रंगारपुरे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना नितीन देशमुख, व गजानन जोगदंड कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्याख्याते सचिन गायकवाड यांनी केले.तर आभार बालाजी मोहिते जिल्हाप्रमुख यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेडचे नितीन देशमुख, महानगर अध्यक्ष गजानन जोगदंड जिल्हाप्रमुख बालाजी मोहिते,शिवाजी तोलमारे स्वप्नील गरुड,वाघ साहेब, नरसाळे साहेब,मंगेश भारकड, सुधकर कदम,प्रलाह राठोड, सचिन सुपरणिस यांनी परिश्रम घेतले.