ताज्या घडामोडी

उल्लेखनिय व विशेष कामगिरी बजावणाऱ्या ग्रामसेविका संगीता पाटील यांचा भव्य सत्कार

महिला उत्कर्ष समितीने केला “त्यांचा”सत्कार .

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र तर्फे समितीच्या प्रदेश कार्याध्यक्ष श्रुतीताई उरणकर यांच्या हस्ते कणकवली तालुक्यातील दिव्यांग संगीता पाटील यांचा त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल शाल,श्रीफळ,गुलाब पुष्प देऊन आज सत्कार करण्यात आला. त्याच सोबतच पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सप्त ज्योती म्हणून पनवेल येथे संगीता पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पाटील यांनी दिव्यांग महासंघाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे आणि त्या आजही एकता दिव्यांग संस्थेमध्ये दिव्यांगांसाठी काम करीत आहेत. दिव्यांगांना त्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना प्राप्त करून देत आहेत.त्याचबरोबरच कोरोना काळात दिव्यांगाना कामात सूट असूनही कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जीवाची पर्वा न करता त्यांनी काम केले आहे. हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.त्यावेळी टीव्ही 9, एबीपी माझा साठी त्यांची खास मुलाखत घेण्यात आली होती.दरम्यान वेगवेगळ्या प्रतिष्ठानांकडून त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला होता. त्यांच्या कामाची ही दखल महिला उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला .
सदरहु आयोजित कार्यक्रमाला महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्गच्या अध्यक्षा ज्योतिका हरयाण, सचिव सुप्रिया पाटील, सदस्य दुर्वा मानकर,स्वरदा खांडेकर,नेहा कोळंबकर चंद्रकला चंद्रमोहन मानकर आदीं महिला उपस्थित होत्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close