अम्मा का टिफिन परिवारातील सदस्यांची निशुल्क आरोग्य तपासणी
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अम्मा का टिफिन या उपक्रमातील सर्व सदस्यांची जागतिक आरोग्य दिनानिमित्त निशुल्क आरोग्य तपासणी व निशुल्क औषध उपचार आज करण्यात आला.
यावेळी औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. राहुल कांबळे, डॉ. वर्षा साबळे, डॉ. मृण्मयी पाटील, अधिपरिचारीका शिवाणी कुंडले, वंदना दुर्गे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर संघटीका सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, वैशाली मेश्राम, वैशाली मद्दीवार, कल्पना शिंदे, वंदना हजारे, कौसर खान आदींची उपस्थिती होती.
चंद्रपुरातील कोणताही गरजू उपाशी पोटी राहु नये यासाठी आमदार जोरगेवार यांनी अम्मा का टिफिन हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमा अंतर्गत दररोज नियमित रित्या गरजवंतांना घरपोच जेवणाचा डब्बा पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
भोजणाच्या व्यवस्थेसह या परिवारातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी आमदार जोरगेवार यांच्या वतीने घेतल्या जात आहे. महिण्यातुन एकदा या परिवारातील सदस्यांची आरोग्य तपासणी केल्या जाते. दरम्यान आज जागतिक आरोग्य दिना निमित्त सदरहु परिवारातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात रक्तदाब, मधुमेह, यासह विविध तपासण्या करण्यात आल्यात.