ताज्या घडामोडी

पुण्यात रक्तदान शिबीरांचे आयोजन

रक्तदान… सर्वश्रेष्ठ दान

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

रस्ते अपघात आणि विविध आजारातल्या रुग्णांना तातडीने रक्त पुरवठा करण्यासाठी सर्वच रुग्णालयांना रक्तपेढ्यांवर अवलंबून रहावे लागते.
त्यासाठी रक्तपेढ्या, अनेक सेवाभावी संस्था आणि मान्यवर व्यक्तींच्या पुढाकारातून रक्तदान शिबीरांचे आयोजन केले जाते.
परंतू मागील वर्षभर कोरोना संकटकाळात रक्तसंकलन थांबल्याने विविध रक्तगटांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
त्या अनुषंगाने, सामाजिक बांधिलकी म्हणून पुण्यातील ( हजरत सुब्हानशाह सोशल फाउंडेशन ) इश्तियाक शेख मित्र मंडळातर्फे सय्यद अश्फाक शिकीलगार आणि परिवारातील सदस्यांनी पुढाकार घेऊन आज एका भव्य रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवार पेठेतील दर्ग्या जवळ खासदार मा. श्री. गिरिशजी बापट यांचे शुभहस्ते सकाळी 9 वाजता शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
दुपारी 4 वाजता संपन्न झालेल्या ह्या कार्यक्रमासाठी शिवसेना शहरप्रमुख मा. श्री. मोरे साहेब, बाळासाहेब मालुसरे, नगरसेवक राजन काची, मा.नगरसेवक नामदेव माळवधे, अजय खेडेकर तसेच आशपाक शिकीलगर यांच्या परीवारातील सदस्य सैय्यद इम्रान, सैय्यद ईसरार, सैय्यद आबरार, आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते हजर होते .
ह्या शिबीरात 150 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
सामाजिक दायित्व म्हणून आजचा हा समाजोपयोगी उपक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वमंगल सेवा प्रतिष्ठान, पी. एस. आय. ब्लड बँक, ए. एस. जी. आय हाॅस्पिटल आणि सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद मानल्या गेले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close