ताज्या घडामोडी

प्राथमिक आरोग्य केंद्र शेगांव (बु) येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुंडण आंदोलन

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

मुंडण आंदोलनांची दखल नाही घेतली तर प्रहार सेवक विनोद उमरे व आयोजक अक्षयभाऊ बोंदगुलवार यांच्या आरोग्य विभागाच्या कार्यालया बाहेर धिंगाणा घालून आंदोलन करू असा ईशारा

प्राथमिक आरोग्य केंद्र शेगांव (बु) येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुंडण आंदोलन

मुंडण आंदोलनाच्या प्रमुख मागण्या.

१) प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून द्यावेत. २)तात्काळ रिक्त पदांची भरती करण्यात यावी.३)सुसज्य रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी.


४)वाॅल कंपाऊंडरसाठी व अन्य कामांसाठी अतिरिक्त निधी त्वरित उपलब्ध करावा. ५)सिटी स्कॅन व एक्सरे मशीन उपलब्ध करावी.
६)रूग्णालयासाठी लागणाऱ्या योय-सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे.
प्राथमिक आरोग्य केंद्र शेगांव ( बु) येथे नवीन आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. येथील शेतकरी, कामगार,अपंग, विद्यार्थी यांना वरोरा सारख्या शहरात जाऊन उपचार करावा लागतो. या वरिल मागण्या करीता आज१५ मार्च २०२२ रोज मंगळवारला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या मागण्या पूर्ण न झाल्यास आरोग्य विभागाच्या कार्यालया बाहेर धिंगाणा घालून आंदोलन करू असा इशारा प्रहार सेवक विनोद उमरे यांनी दिला त्यावेळी आंदोलनाचे आयोजक अक्षयभाऊ बोंदगुलवार ,व प्रहार सेवक शेरखान भाऊ पठाण, अमोल दात्तारकर, गिताताई पुलकर महिला आघाडी प्रमुख, अशिद मेश्राम, किशोरभाऊ डुकरे, व सामान्य नागरिक सुद्धा जास्त संख्येने उपस्थित होते..!

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close