रमाई बुध्द विहार विठ्ठलवाडा येथे सावित्रीमाई फुले यांची 191 वी जयंती साजरी
ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
महिला शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 191 व्या जयंती निमित्ताने आज सायंकाळी 7:00 वाजता रमाई बुध्द विहार विठ्ठलवाडा येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली.
सावित्रीमाईमुळे शिक्षण घेऊन आज सर्व स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत आणि निर्भिडपणे उच्च पदावर कार्य करत आहेत.देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत
आहेत.स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहेत.याच श्रेय खऱ्या अर्थाने क्रांतिज्योती सावित्रीमाईंनी त्याकाळात स्त्रियांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या कष्टाला व सहन केलेल्या हालअपेष्टाना जाते.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तंटा मुक्त समिती अध्यक्ष संगीताताई फरकडे,ग्राम पंचायत सदस्य रेखाताई रामटेके,दर्शना दुर्गे, पुजाताई आक्केवार,धम्मदीक्षा चांदेकर यांचे सहकार्य लाभले.