ताज्या घडामोडी

बिकली येथील इसमाची स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

नागभीड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बिकली येथील इसमाने स्वतःच्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे . आनंदराव रामाजी साहारे ( ५१ ) रा.बिकली असे मृतकाचे नाव असून दि .२३ डिसेंबर २०२१ रोजी दुपारच्या सुमारास मृतकाची पत्नी कपडे धुण्यासाठी तलावावर गेली व कपडे धुवून घरी आल्यावर चाफ्यामध्ये बघताच तिचे पती गळफास घेऊन मृत अवस्थेत अटकलेले दिसताच आरडाओरडा केली . सदर इसमाने घरी कुणी नसल्याची संधी साधून स्वतःच्या घरीच चाप्या मध्ये आळ्याला दोरी दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली . घटनेची माहिती पोलिसांना नागभीड मिळताच घटना स्थळ गाठून पंचनामा व शवविच्छेदन करून प्रेत घरच्याना देण्यात आले मृतकाला आई वडील , पत्नी व दोन मुले आहेत .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close