खेळाडूने वादविवाद न करता पंचाचा निर्णय अंतिम माणूनच खेळ खेळावे– खा. अशोक नेते
जय बजरंग क्रिकेट क्लब संताजी नगर चामोर्शी द्वारा आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट महोत्सव भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चामोर्शी शहरातील युवा वर्गानी एकत्रित येऊन दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोज रविवार ला जय बजरंग क्रिकेट क्लब संताजी नगर चामोर्शी द्वारा आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट महोत्सव भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भूमी एंपायर मैदान संताजी नगर चामोर्शी येथे करण्यात आले.
या भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत क्रिकेट हा खेळ लोकप्रिय झालेला आहे. या खेळाबरोबरचं युवकांच्या शारीरिक व्यायाम व तंदुरुस्त सुदृढ शरीर राहण्यासाठी खेळ खेळणे आवश्यक आहे.
यावेळी चामोर्शी शहराविषयी च्या समस्या बाबत लक्षवेधुन आपल्या भावना व्यक्त करताना खासदार अशोक नेते म्हणाले की, सुरजागड हा लोह प्रकल्प सुद्धा माझ्या विशेष प्रयत्नाने सुरु झाला.चामोर्शी त पिण्याच्या पाण्याची अगोदर गैरसोय व खुपच समस्या होती.त्याकाळी भाजपाचे आमचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोहळे यांच्या पत्नी चामोर्शी च्या सरपंच होत्या. त्यावेळी सुद्धा पाण्याच्या पाण्याची व आरोग्याची समस्या होती. त्यावेळेस पाण्या संबधीत मी माझ्या प्रयत्नांने चामोर्शी च्या पिण्याच्या पाण्यासाठी लोकवर्गणीतून 15%, पैसे भरून पाण्याची समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला होता त्याबरोबरच आता सुद्धा मी या चामोर्शी च्या जनतेसाठी चांगले पिण्याचे पाणी मिळावे. जल हे जीवन आहे पाण्यामुळे आरोग्य चांगले राहते यासाठी सुद्धा माझा विशेष प्रयत्न राहील. न्यायालयासाठी सुद्धा मी मागणी केली होती जिल्ह्याच्या व आपल्या तालुक्याच्या विकासासाठी अनेक कामे खेचून आणले जिल्ह्याचा विकास हाच माझा ध्येय आहे.असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी करत
दहा बारा दिवस सतत चालणाऱ्या खेळाला
चांगल्या तऱ्हेने शांततेत पार पाडावे अशा शुभेच्छा देतो.
असे प्रतिपादन या क्रिकेट
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.
पुढे बोलतांना खासदार अशोक नेते यांनी खेळाडूंविषयी बोलतांना या वर्षी अनेक युवक वर्ग उत्साहाने प्रोत्साहित होऊन क्रिकेट टूर्नामेंट मध्ये सहभागी होऊन खेळ खेळल्या जात आहे. युवा मोर्चा च्या प्रत्येक कार्याचे सक्तीने साथ देऊन सदैव युवा मोर्चा च्या मी पाठीशी आहे.
क्रिकेट या खेळात पंचाची महत्वाची भूमिका असते.यासाठी पंचाचा निर्णय अंतिम माणूनच वादविवाद न करता खेळ खेळावे.
असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी उद्घाटन स्थानावरून केले.
विशेष आकर्षक
चामोर्शी च्या लक्ष्मी गेट पासुन तर भूमी एंपायर क्रिकेट मैदानापर्यंत डिजे गाण्याच्या तालात श्रीरामाच्या गर्जनासह रॅलीचे आयोजन भव्य मोठया थाटात करण्यात आले.
या भव्य डे नाईट टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांनी फित कापून केले.नंतर लगेच खासदार अशोक नेते यांनी हातात बॅट घेऊन खेळण्याचा आनंद घेण्यासाठी उत्सुकतेने मैदानात उतरून खेळ खेळला.
यावेळी मंचावर प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबूराव कोहळे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, शहराध्यक्ष सोपान नैताम,जेष्ठ नेते माणिक कोहळे,जेष्ठ नेते तथा संचालक अशोक धोडसे, माजी न्यायाधीश दीक्षित साहेब,बंगाली आघाडी जे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा,सरपंच तथा युवा नेते श्रीकांत ओल्लालवार, जिल्हा सचिव दिलीप चलाख,साईनाथ बुरांडे,आदिवासी आघाडी चे रेवनाथ कुसराम, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष निखिल धोडरे, नरेश अलसावार,संतोष भांडेकर, तुषार दुधबावरे,तसेच मंडळाचे सदस्यगण व मोठ्या संख्येने युवा खेळाडू वर्ग उपस्थित होते.