ताज्या घडामोडी

चिमुर तालुक्यात विविध कारणाने तिन व्यक्तींचा मृत्यु

ऊपसंपादक : श्री विशाल इन्दोरकर
मो .8600733445

चिमूर व भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेटेपार, मालेवाडा, कवडसी येथील विवीध कारणाने तिन व्यक्ती चा मृत्यु शुक्रवार ला झाला असुन शेताकडे जात असताना पिंपळगाव वरूण बाईकने भरधाव वेगाने येत असलेल्या व्यक्ती ने जोरदार धडक दिल्याने साठ वर्षीय वृद्धा चा अपघात शुक्रवार ला साडे अकरा वाजता झाला. अपघातग्रस्त व्यक्ती ला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यु झाला. अपघातग्रस्त मृतकाचे नाव सहादेव तुकाराम सहारे रा. मेटेपार येथील रहीवासी आहे. दुसरा व्यक्ती हा शेतकरी असुन तिन वर्षा पासुन पिकपाणी होत नसल्याने त्रस्त होता त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत होता बऱ्याच दिवसा पासून त्याची मानसीक स्थिती बरोबर नसल्यामुळे गावाशेजारील सुगत कुटी परिसरातील जंगलात झाडाला फासी लावुण आत्महत्या केली. हि घटना शुक्रवार ला दिड वाजता च्या दरम्याण घडली. आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती चे नाव प्रमोद पांडुरंग भोयर वय ३० वर्ष हा मालेवाडा येथील रहीवासी आहे. तिसरा व्यक्ती तिन दिवसा पासुन घरातुन निघुन गेला होता त्याच्या घरच्यांनी शोधा शोध केली असता त्याचा शोध लागला नाही दरम्यान कवडसी येथील शेतकरी अरुण नन्नावरे शेतात पाणी करन्यासाठी शेतातील डोहात मोटार लावन्यासाठी गेले असता पान्यावर व्यक्तीचे प्रेत तरंगताना दिसले त्यानी पोलीसांना माहीती दिली पोलीसांनी घटनास्थळ गाठुन प्रेताला बाहेर काढले असता तो व्यक्ती दिपक सरदार नैताम वय ३० वर्ष असुन चिमूर येथील राम मंदीर नेताजी वार्ड येथील सासऱ्या कडे कुंटूबा सहीत राहत होता तो रा. बामणी ता. उमरेड येथील रहीवासी आहे. हि घटना दुपार ला शेतकरी शेतात पाणी करन्यासाठी गेला असता उघडकीस आली.
भिसी व चिमूर पोलीसांनी घटणा स्थळाचा पंचनामा करून तिन्ही प्रेत शवविच्छेदनासाठी चिमूर येथील उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close