जिल्हा परिषद शाळा वाघाळा येथे आनंद नागरी उत्साहात साजरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवार १४ जानेवारी रोजी आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते हा सोहळा बालगोपाळांच्या उत्स्फुर्त सहभागात संपन्न झाला.
यावेळी आनंदनगरी कार्यक्रमाचे उदघाटन गावचे प्रथम नागरिक सरपंच बंटी पाटील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुशील घुंबरे,माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकआप्पा घुंबरे मुख्याध्यापक तुकाराम साळुंके या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती शुभारंभ करण्यात आला.
या वेळी सौ. सुनयना चव्हाण सौ.बागेश्री वडगावकर आणि सौ.दुधनकर यांनी सुंदर रांगोळी काढून येणाऱ्या सर्व गावकऱ्यांचे स्वागत केले. या वेळी या आनंद नागरिचे मुख्य आकर्षण म्हणजे वर्ग दहावीच्या विध्यार्थी यांनी टाकलेले शिवनेरी हॉटेल यातून त्यांनी कमवा व शिका हा संदेश दिला. या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक श्री स्वामी शेख मुजीब , शंकर धावारे , सुमित लांडे , पवन पाटील , विलास शिंदे , सूत्रावे, जाधव आणि कासले ,सचिन वाघ यांनी परिश्रम घेतले .