सागवनी मालाची वाहतूक करणारा ट्रक गोंडपीपरी तलावाजवळ पलटला

वाहन चालक किरकोळ जखमी
ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
सागवान मालाची वाहतूक करणारा ट्रक चंद्रपूर-अहेरी मार्गावर बकरा टर्निंग ला लागून असलेल्या गोंडपीपरी वन तलावाजवळ पलटला.

ट्रक पलटल्याने ट्रक चालकाला किरकोळ इजा झाली.
ओडिसा येथून ट्रक क्रमांक जी जे 12 बी टी 6511 येथे सागवानी माल भरून
गुजरात कडे निघालेल्या वाहनाचा अपघात झाला .
यात सांगवन जातीच्या कटिंग केलेल्या पाट्या भरून होत्या.
ट्रॅक पलटल्याने सागवानी पाट्या विखुरल्या.
ट्रॅक पलटल्याने सागवान माल हा तस्करीचा असावा अशी शंका घेतल्या गेली.
मात्र चालकाकडे सागवान मालाची कागदपत्रे होती.
कागदपत्राची तपासणी गोंडपीपरी येथील वन विभागाने केली असता तो सागवानी माल वैध असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. ट्रॅक मधील सागवान विदेशातील उच्च प्रतीचे असून आपल्या कडे या जातीचे सागवान वृक्ष नसल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे यांनी आज दि.15 नोव्हेंबर रोज सोमवारला दिली आहे.
वाहन चालकाचा रस्ता चुकल्याने सदर वाहन गोंडपीपरीकडे येत असताना ट्रक पलटल्याने
वाहनाचा दर्शनी भाग क्षतीग्रस्त झाला आहे.
लगेच दुसरे वाहन बोलवून गोंडपीपरी तालुक्यातील करंजी येथील मजूर लावून विखुरलेल्या सागवान पाट्या दुसऱ्या वाहनात भरण्यात आले आहे.
सदर माल हा अठरा लाख, 37 हजार ,पाचशे 29 रुपयाचा असल्याचे तपासणी अंती समजून आले.