ताज्या घडामोडी

नाशिक येथून आलेले रविन्द्र शिंदे यांनी चिमुर पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारला

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

चिमुर पोलिस स्टेशन मधे बदली प्रकरणावरून झालेल्या नाट्यमय घड़ामोड़ीवर अखेर पडदा पडला असून तत्कालीन पोलिस निरीक्षक स्वप्निल धुळे यांचे जागेवर नाशिक येथून आलेले रविन्द्र शिंदे यांनी चिमुर पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे.

चिमुर येथे पोलिस नीरीक्षक स्वप्निल धुळे कार्यरत असताना चंद्रपुर जिल्ह्यातील पोलिस नीरीक्षक व उप पोलिस नीरीक्षकासह अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचे बदलयांचे सत्र नुकतेच पोलिस अधिक्षकांनी राबविले, बदली झालेल्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे सांगण्यात आले, सदर आदेशावरुन अनेक अधिकारी व कर्मचारी रुजू झालेत, मात्र चंद्रपुर शहर पोलिस ठान्यातुन चिमुर पोलिस स्टेशनला बदली झालेले पोलिस नीरीक्षक बहादुरे यानी चिमुर क्रांतिभूमित येण्यास नकार दर्शविला, व त्यानी वरीष्ठांकडे विनंती अर्ज करून मुख्यालयताच आर्थिक गुन्हे शाखेत आपली वर्णी लाऊन घेतली, दुसरीकडे चिमुरचे ठानेदार स्वप्निल धुळे यांचा कार्यकाल संपन्यापूर्वीच त्यांची बदली झाल्याने त्यानांच येथे कायम ठेवावे असी मागणी नागरिकांकडून केली जात होती.

पोलिस नीरीक्षक स्वप्निल धुळे यांचे बदलिने व ठानेदार बहादूरे यांच्या नकारामुळे 6 दिवसाचा कालावधि होऊन सुधा चिमुर मधे कोनतेच पोलिस अधिकारी आले नाही अशातच दिनांक 6 नोव्हेबर ला नाशिक येथून आलेले पोलिस नीरीक्षक रविन्द्र मुक्ताराम शिंदे यांनी चिमुर पोलिस स्टेशनचा ठानेदार पदाचा कार्यभार स्वीकारला, यावेळी ठानेदार शिंदे यांनी चिमुर परिसरातील माहिती अधिकाऱ्यांकडून जानूंन घेतली.

या पूर्वी नाशिक पोलिस स्टेशनला पोलिस नीरीक्षक रविन्द्र शिंदे कार्यभार सांभाळत होते, या आधी त्यानी गोंदिया, गडचिरोली येथे सुद्धा शाषणाच्या निर्देशाचे प्रभाविपने अंमलबजावणी केली, ठानेदार रविन्द्र शिंदे हे चिमुर परिसरात नवीन असल्याने त्याना येथील भौगोलिक परिस्थिति, संवेदनशील गाव, लोकांची मानसिकता ओळखून कामें करताना चांगलेच परिश्रम घ्यावे लागणार आहे, नवीन ठानेदार याणा अवैध व्यवसायीकांचे मोठे आवाहन असणार आहेत, ते कशाप्रकारे हाताळतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close