ताज्या घडामोडी
जनता विद्यालय नेरीचा वेदांत अजय सोमनाथे याची नवोदय विद्यालय येथे निवड
प्रतिनिधीः राहुल गहुकर
जनता विद्यालय नेरीचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
जनता विद्यालय नेरीचा विद्यार्थी वेदांत अजय सोमनाथे याची नवोदय विद्यालयात निवड झाली असून या वर्षी ही या विद्यालयातून दुसरी निवड आहे. या आधी अनुराग संजय चांदेकर याची निवड झालेली आहे.
जनता विद्यालयात नवोदय विद्यालय परीक्षेचे घेतले जाणारे अधिकचे क्लासेस, शिक्षकांची मेहनत यामुळे प्रत्येक वर्षी या शाळेतून नवोदयला विद्यार्थी निवड होत आहेत.
लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरीचे सर्व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एन. येरणे, पर्यवेक्षिका कु. बी. के. बमनोटे, नवोदय प्रमुख श्री. एस. पी. पंधरे, सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
वेदांतने आपल्या यशाचे श्रेय त्याला शिकवणारे शिक्षक, आपले आई वडील यांना दिले.