ताज्या घडामोडी

सर्व पक्षीय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कळवण्यात येते की,जय महेश सुगर्स लि. पवारवाडी ता.माजलगाव व गंगाखेड सुगर्स लि.गंगाखेड या दोन्ही साखर कारखान्यांनी आपल्या पाथरी भागातील ऊसतोड करणाऱ्या टोळ्या व वाहन उचलून त्यांच्या भागात नेत आहेत त्यामुळे आपण सर्व पक्षीय असा निर्णय घेतला होता की,रेणुका सुगर्स प्रा.लि. पाथरी साखर कारखान्याने पाथरी तालुक्याच्या बाहेर ऊसतोड करणाऱ्या सर्व टोळ्या व वाहन पाथरी तालुक्यात बुधवार दिनांक 23/02/2022 रोजी रात्री 12 : 00 पर्यंत आपल्या पाथरी तालुक्यात आणावेत नसता गुरुवार दिनांक 24/02/2022 रोजी सकाळी ठीक 10 : 00 वाजता रेणुका सुगर्स लि पाथरी कारखान्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी येथुन मोर्चा निघणार होता परंतु रेणुका शुगर्स च्या प्रशासनाने मोर्चा न काढण्याची विनंती करून आम्ही सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती येथे येऊन चर्चा करून मार्ग काढू या प्रसंगी मा .आ. बाबाजानी दुर्रानी साहेब यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन रेणुका शुगर्स चे युनिट हेड उमाकांत पौळ यांनी पाथरी तालुक्या बाहेरील असलेले ऊसतोड वाहन तालुक्यात माघून घेऊ व पुढे फक्त पाथरी तालुकाच कार्यक्षेत्र राहील असे लेखी आश्वासन दिले.या प्रसंगी अनिलराव नखाते सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी,सुभाषराव कोल्हे,चक्रधरराव उगले उपसभापती एकनाथराव शिंदे,दत्तराव मयंदळे संचालक परभणी जिल्हा मध्यवर्ती सह. बँक,दादासाहेब टेंगसे,अशोकराव गिराम,राजेश ढगे,कॉम्रेट दीपक लिपणे अजिंक्यभैय्या नखाते,इल्यास शेख एच.आर.मॅनेजर, शेतकीअधिकारी सुनील खामकर व सर्वपक्षीय ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close