ताज्या घडामोडी

सोनपेठ शहरात दंत आरोग्य तपासणी शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक – २ ऑक्टोंबर २०२२ वार रविवार रोजी , स्थळ – आनंदी दाताचा दवाखाना आंबेडकर चोक, आठवडी बाजार, देशमुख कॉम्प्लेक्स, सोनपेठ. जि. परभणी. या ठिकाणी नवरात्र महोत्सव व , मातोश्री के. सो. कमलबाई देविदास वाडकर यांच्या सहाव्या पुण्य स्मृती दिनानिमित्त व महात्मा गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अशा पंच सुत्रिय औचित्य साधून , ब्रह्माकुमारीज सोनपेठ आयोजित , सोनपेठ तालुका व सोनपेठ शहर वासिया साठी ब्रह्मा कुमारी मीरा दीदी यांच्या संकल्पनेतून डॉ. सचिन कस्पटे बी. डी. एस. यांच्या सहकार्याने प्रथमच मोफत दंत आरोग्य एक दिवसीय शिबीर चे आयोजन करण्यात होते , ब्रह्मा कुमारी सेंटर सोनपेठ संचालिका, ब्रह्मा कुमारी मीरा दीदी यांनी सुत्रशी बोलताना सांगितले की , सोनपेठ शहर व सोनपेठ तालुक्यातील गरजू ५० लोकांनी दंत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला मला खास सांगावेसे वाटते की , आमच्या आईसाहेब या धार्मिक व सदाचारी सद विचारी वृती च्या असल्या कारणांनी लहान पणापासून आम्हा मुलांना परोपकारी वरतणुक अंगी जडली असावी . जसे म्हतले जाते अन्नमय प्राण अन्न शिवाय जिवन नाही त्ाचप्रमाणे अन्न पचन साठी सुदृढ दात असणे गरजेचे आहे .माझ्या आईसाहेब यांना काही काळापूर्वी बऱ्या पैकी दात पडल्या कारणाने व दंत उपचाादरम्यान शारीरिक अशक्त पणा असल्यामुळे पोटाची उपासमार होत होती त्यासाठी मनोमन विचार केला जो त्रास आई ने सहन केला तो त्रास कोणत्याही आई बाबा होऊ नये लवकर निदान केले जावे. तसेच आज काल जीवन पद्धती बदलत चाललेली दिसून येते आहे. फास्ट फूड ,जंक फूड ,केक चॉकलेट ,बिस्कीट, चहा ,तंबाखू ,बिडी सिगारेट ,गुटखा, गोवा याच्या अती सेवनाने दाताचे विकार जडले जातात.तसेच या दंत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटक म्हणून ब्रह्मा कुमारी मीरा दीदी देविदास वाडकर ब्रह्मा कुमारी सेंटर इंचार्ज तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था तालुका महिला अध्यक्ष , प्रमुख पाहुणे . गणेश मुंडे , सपत्नीक डॉ. राजकुमार फड प्रमुख उस्थितीमध्ये , रो. अध्यक्ष कागदे सर, रो. बाल मुकुंद जी सारडा , रहमान सौदागर, काझी समयोदिन , शेख निसार , शेख चांद पाशा विटेकर, आनंद डाके , दंत आरोग्य तपासणी शिबिर साठी आलेले लहान पासून वृद्ध पर्यंत चे पेशंट प्रशांत शिंदे , आराध्या डाके , अक्षय चिवडे, बालासाहेब कणसे इत्यादी नी लाभ घेतला तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉक्टर. सचिन कस्पटे व ब्रह्माकुमारी मीरा दीदी यांनी मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close