नेरी महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी हरिदास चांदेकर विराजमान
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
ग्रामपंचायत नेरी येथे ग्रामसभा ग्रामपंचायत सरपंचा रेखा पिसे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी हरिदास चांदेकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी हरिदास चांदेकर, रुस्तमखा पठाण, संदीप दयाराम पिसे यांचे नाव नोंद घेण्यात आली. परंतु रुस्तमखा पठाण यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे संदीप पिसे व हरिदास चांदेकर या दोघांची मतदारांना मार्फत निवडणूक घेण्यात आली. त्यात हरिदास चांदेकर यांना सर्वाधिक 127 मते मिळाली तर संदीप पिसे यांना 29 मते मिळाली त्यामुळे हरिदास चांदेकर यांची बहुमताने महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे यासाठी अस्तित्वात आले आहे.हा महाराष्ट्र शासन अधिकृत प्रकल्प आहे .15 ऑगस्ट 2007 साली या योजनेची सुरुवात झाली. ही संकल्पना महात्मा गांधीजीच्या विचारावर आधारलेली आहे. गाव पातळीवर शांतता नांदावी, छोट्या छोट्या कारणावरून निर्माण होणाऱ्या तंट्याचे पर्यावसान मोठ्या तंट्यात होऊ नये. वादांमध्ये मालमत्ता अडकून त्यातून आर्थिक नुकसान होऊ नये. कुटुंबाचे ,समाजाचे, गावाची शांतता धोक्यात येऊ नये. आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेऊन हे निवाडे केले जावेत. ग्रामसभा घेऊन तंटामुक्त योजनेच्या सदस्यांची निवड केली जाते. या योजनेत सर्व साधारण चार प्रकारचे तंटे मिटले जातात. यामध्ये दिवाणी प्रकारात स्थावर मालमत्तेचे ,मालकी हक्क, वारसाहक्क, वाटप, हस्तांतरण तर महसुली प्रकारात शेतीची मालकी, महसुली हक्क, अतिक्रमणे, गावठाणातील जागा, परडे ,खानाखुना ,कुळकायदा तर फौजदारी मध्ये शारीरिक, मालमत्ता आणि फसवणूक यासंबंधीचे पात्र गुन्हे तसेच दखलपात्र गुन्हा पैकी जे गुन्हे दोन्ही बाजूंकडील संमतीने व कायद्यानुसार मिटवता येतील असे गुन्हे .या व्यतिरिक्त सहकार, औद्योगिक क्षेत्रातील तंट्याचा समावेश केला जातो.