ताज्या घडामोडी

प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देईपर्यंत लढू- सखाराम बोबडे पडेगावकर

जिल्हा प्रतिनिधि:अहमद अन्सारी परभणी

पालम
माजलगाव कालव्यात जमिनी गेल्याने विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना शंभर टक्के न्याय मिळवून देई पर्यंत लढाई चालूच राहील असा विश्वास परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी व्यक्त केला. ते विठ्ठलवाडी येथे आयोजित गंगाखेड व पालम तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत बोलत होते.
विठ्ठलवाडी येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात गंगाखेड, पालम तालुक्यातील माजलगाव कालवा अंतर्गत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, तथा धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंदराव यादव, गोपा येथील उपसरपंच गोविंदराव बोबडे, वाघलगावचे माजी सरपंच नारायणराव धनवटे, मालेवाडीचे माजी सरपंच श्रीकांतराव गायकवाड, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे, धनगर समाज संघर्ष समितीचे मुंजाभाऊ लांडे हटकरवाडी ता. मानवत येथील प्रा. नारायण नाईक, विश्वनाथ नाईक यांचेसह मरडसगाव, मसनेरवाडी विठ्ठलवाडी, आनंदवाडी, चाटोरी , गोपा विभागातील शेतकरी उपस्थित होते .या बैठकीत शासनाकडून होत असलेल्या अन्यायाचा पाढा शेतकऱ्यांनी वाचून दाखवला. कालव्यासाठी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनी बागायती असून सुद्धा शासन या जमिनीला जिरायती जमिनी प्रमाणे मूल्यमापन करत भाव देत आहे .हा एक खूप मोठा अन्यायच आहे .बागायती जमिनी प्रमाणे मूल्यांकन मिळणे, ज्या शेतात झाडे बोर, विहीर, घरे ,गोठे असतील त्यांना वेगळी मदत शासनाकडून देण्यात यावी. कालव्यात जमिनी जात असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका शासकीय नोकरी देण्यात यावी. कालव्यावर आवश्यक त्या ठिकाणी पूल उभारण्यात यावेत. भूमिहीन होणाऱ्यांना जमिनी द्याव्यात आदी प्रमुख मागण्या वर चर्चा झाली .गोविंद यादव गोविंद बोबडे, नारायण धनवटे आदींनी आपले विचार मांडले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मल्हार लोखंडे मल्हार व विठ्ठलवाडी येथील युवकांनी प्रयत्न केले. लवकरच तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचाही ठराव या बैठकीत झाला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close