ताज्या घडामोडी

बीड च्या युवकाचा पात्रुड रोडवर भिषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

तालुक्यातील पात्रुड रोडवर भिषण अपघात घडला. सय्यद वहीद्दोदीन फय्याजोद्दीन रा. मासुम कॉलनी मोमीनपुरा बीड या युवकाचा या जागीच मृत्यू झाला अशी बातमी मिळाली आहे. सय्यद वहीद्दोदीन हा युवक आपल्या युनिकॉर्न मोटार सायकल वरुन जात असतांना अज्ञात वाहनाने सय्यद वहीद्दोदीन सय्यद फय्याजोद्दीन ( वय ३३ वर्षें )च्या मोटार सायकल ला धडक दिली आहे का हे अजून समजले नाही! सय्यद वहीद्दोदीन हा सिमेंट रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत नागरीकांना दिसला. काही सुजान नागरीकांनी धावपळ करत त्याच्या जवळ जाऊन त्याची तपासणी केली असता, त्याचा जागीच मृत्यू झाला आहे हे कळते. त्याची युनिकॉर्न मोटार सायकल ( एम एच २४ ए डी ५८२७ ) त्यांच्या काही फुट अंतरावरच अस्ताव्यस्त पडलेली दिसत आहे. सदरचा ईसम कोण आहे याची तपासणी करता त्यांच्या खिशात त्याची ओळख पटवनारे आय कार्ड सापडले असुन . सय्यद वहीद्दोदीन फय्याजोद्दीन अशी त्यांची ओळख पटली असुन तो बीडच्या मासुम कॉलनी, मोमिनपुरा बीड येथील रहिवासी असल्याचे निदर्शनास आले आहे. सुज्ञ नागरीकांना पोलीस स्टेशनला या अपघाताची माहिती दिलीआहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close