गुरूवारी योगेश्वरी शुगर्सच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी परभणी
पाथरी तालुक्यातील लक्ष्मिनगर लिंबा येथील योगेश्वरी शुगर्सच्या विसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरूवार २० ऑक्टोबर रोजी हरीभाऊ तात्यासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते दुपारी एक वाजताच्या शुभ मुहर्तावर संप्पन्न होणार असल्याची माहिती या साखर कारखाण्याचे कार्यकारी संचालक अॅड रोहित आर देशमुख यांनी दिली.
या वेळी प्रमुख उपस्थितीत एम टी नाना देशमुख,जी टी भाऊ देशमुख माजलगाव मतदार संघाचे माजी आमदार तथा या साखर कारखाण्याचे चेअरमन आर टी जिजा देशमुख व देशमुख परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत गव्हाण आणि मोळी पुजनाने या वर्षीच्या विसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ होणार आहे.या कार्यक्रमा साठी ऊस उत्पादक,तोडणी कामगार,ठेकेदार यांनी कोव्हिड-१९ नियमांचे पालन करत उपस्थित राहाण्याचे आवाहन संचालक राहुल आर देशमुख,डॉ अभिजत आर देशमुख,कार्यकारी संचालक अॅड रोहित आर देशमुख तसेच सर्व संचालक,प्रवर्तक,अधिकारी,कामगार वृंदाच्या वतिने करण्यात आले आहे.