उमेद अभियानाची पहिल्या तिमाहीची आढावा बैठक संपन्न

तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल
आज दिनांक 10/ 6/ 2021 ला दुपारी 2.00 वाजता सन 2021- 22 या आर्थिक वर्षात प्राप्त उद्दिष्टपूर्ती संबंधाने वृंदावन प्रभाग संघ कार्यालय डोंगरगाव येथे आढावा बैठक घेण्यात आली. सदर आढावा बैठकीला मा. ताजने सर, जिल्हा अभियान व्यवस्थापक, मा.भांडारकर सर जिल्हा व्यवस्थापक (MIS), मा. नैताम सर, जिल्हा व्यवस्थापक(LIV.) मा.श्री संदीप घोंगे सर (OS) उपस्थित होते. यावेळी कोविड व लसीकरण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच अभियानातील आत्तापर्यंतची प्रभागसंघाची वाटचाल व आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा आढावा घेण्यात आला तसेच पुढील कामाचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली. आर्थिक देवाण घेवाण यावर चर्चा करण्यात आली. विविध शासकीय निधी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर आढावा बैठकीला यशस्वी प्रभागसंघ चिचाला/केळझर व वृंदावन प्रभागसंघ अध्यक्ष, सचिव तसेच गावातील ग्राम संघाचे अध्यक्ष सचिव व कॅडर उपस्थित होते. तालुका अभियान व्यवस्थापक कक्षातील श्री. तुराणकर सर तालुका व्यवस्थापक (IBCB), श्री. जिवनकर सर तालुका व्यवस्थापक (MIS), श्री. मडावी सर तालुका समन्वयक(OF), जयश्री कामडी मॅडम तालुका समन्वयक (FL), श्री. बोरकर प्रभाग समन्वयक, श्री. रंगारी प्रभाग समन्वयक, श्री. आदे प्रभाग समन्वयक(OF), श्री. गड्डमवार(CAM), भावना कुमरे(CLFM) उपस्थित होते.