ताज्या घडामोडी

शारदा फाउंडेशन व शालेय विद्यार्थ्यांच्या वतीनी बांधला वनराई बंधारा

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

शारदा फाउंडेशन रजि. नंबर महा ८५५ पुणे व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा परसोडाच्या तालुका वरोरा चे वतीने वनराई बंधारा बांधण्याचे नियोजन शारदा फाऊंडेशनचे अध्यक्ष मा श्री निकेश आमने-पाटील. व शाळेचे मुख्याध्यापक मा श्री.विजय उमरे यांच्या नेतृत्वाखाली शारदा फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री शुभम आमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

फाउंडेशन चे सर्व सदस्य तथा शाळेतील सर्व शिक्षक यांनी आपली तत्परता दाखविली. शारदा फाउंडेशन व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने बंधारा बांधण्याचे ठरविले. आणि नुकतेच परसोडा या गावातील नियमित नाल्यावर शारदा फाउंडेशन व शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी शारदा फाउंडेशनचे उपाध्यक्ष शुभम आमने यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या गमतीजमतीत वनराई बंधाऱ्याच्या महत्व पटवून देऊन विद्यार्थ्यांचा व फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे उत्साह वाढविण्याचे काम केले. यावेळी शारदा फाउंडेशनचे सदस्य शंकर गारघाटे, आशिष आवारी, मयूर रामटेके, कौशल कुमरे, महेंद्र तामगाडगे, निखिल गारघाटे. तसेच जि. प. उच्च प्राथमिक शाळा परसोडा चे मुख्यध्यापक शिक्षक वृंद मा. मारुती सिडाम, मा. बंडू बडवे, सौ.कमल येरणे, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष निलेश कुरेकर सदस्य शंकर पावडे. व सर्व फाऊंडेशनचे सदस्य तथा शालेय विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा यशस्वी पने बांधण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close