ताज्या घडामोडी

योगासन स्पर्धेत जि.प.प्रशाळा रुढी शाळेच्या विद्यार्थ्यांची विभागस्तरावर निवड

योगासन स्पर्धेत जि.प.प्रशाळा रुढी शाळेच्या विद्यार्थ्यांची विभागस्तरावर निवड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

नूतन विद्यालय सेलू येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत अत्युच्च कौशल्याचे प्रदर्शन करीत मराठवाडा विभागीय स्पर्धेकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुढी येथील दोन विद्यार्थ्यानी आपले स्थान निश्चित करत विजय संपादन केला आहे

शुभम संपत्ती निर्वळ
सोहम प्रल्हाद शिंदे

हे मराठवाडा विभागस्तर योगासन स्पर्धेसाठी निवड होणारे विद्यार्थी आहेत. त्यांना शाळेतील शिक्षक गंगाधर शिंदाळकर यांनी मार्गदर्शन केले तर इतर सर्व शिक्षकगण, गंगाधर कंकाळ, सोपान नाईकनवरे, उमाकांत हाडूळे, निर्मला घारोळे, सारिका ढगे, रोहिणी खोंडे, माधुरी महाजन यांचे सहकार्य लाभले तथा त्यांनी अभिनंदन केले.
गटशिक्षणाधिकारी रणमाळे साहेब, केंद्रप्रमुख शिरीष लोहट , योगगुरु विलास मिटकरी, मुख्याध्यापक बाळासाहेब घनचक्कर, शालेय व्यवस्थापन समिती, रुढी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. तथा विभागीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close