उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत..कराडच्या दादा शिंगन यांना…हिंदू एकता व शिवजयंती उत्सव यांच्या वतीने समाज रत्न पुरस्कार
प्रतिनिधीः प्रमोद राऊत कराड
कराडचे सामाजिक कार्यकर्ते दादासो बाबू शिंगण यांना समाज रत्न पुरस्काराने केले सन्मानित.. उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत हिंदू एकता आंदोलन व शिवजयंती उत्सव यांच्या वतीने दिला पुरस्कार..
विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दादासो बाबू शिंगण यांना हिंदू एकता आंदोलन व शिवजयंती उत्सव कराड यांच्यावतीने नुकताच समाज रत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला दादा शिंगण यांचे कार्य हे उल्लेखनीय आहे सामाजिक असो वा प्रशासकीय असो अनाथ मुलांना..जेष्ठ नागरिकांना मदत..बेवारस मृत्यू झालेल्या व्यक्तींचा पदरमोड करून अंत्यसंस्कार..तसेच महामार्ग.. गटार इत्यादी संबंधित नागरिकांना होणारे त्रास यासाठी प्रत्येक वेळी आंदोलन करून दादा शिंगण यांनी मार्ग काढले आहेत…यासह विविध सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात… त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत हिंदू एकता आंदोलन व शिवजयंती उत्सव यांच्या वतीने दादा शिंगण यांना समाज रत्न पुरस्कार देण्यात आला मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे उपनगराध्यक्ष मनोहर भाऊ शिंदे कराडचे नगरसेवक आण्णा पावसकर हिंदू एकता आंदोलनचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल यादव बांधकाम सभापती राजेंद्र यादव नगरसेवक राजू मुल्ला शहाजी पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते तसेच सर्व शिवभक्त यांच्या उपस्थितीत दादा शिंगण यांना समाज रत्न हा पुरस्कार देण्यात आला