अल्फा फाउंडेशन च्या वतीने रमजान किट चे वाटप
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत शहरात अल्फा फाउंडेशन च्या वतीने रमजान रेशनिंग किट चे वाटप करण्यात आले. अल्फा फाउंडेशन ५ वर्षापासून गोरगरिबांना अन्न धान्य चे किट म्हणजे रमजान किट सातत्याने वाटप करीत आहे.
सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे या महिन्यात मुस्लिम समाजातील लोक रोजे (उपवास) पाळतात.या महिन्याचा इस्लाम मध्ये खूप महत्त्व आहे. रमजान मध्ये रोजा, नमाजसह दानधर्माला देखील पुण्याचं काम मानलं जातं. याच शिकवणीतून मानवत शहरातील अल्फा फाउंडेशन च्या वतीने गरजू कुटुंबीयांना रेशनिंग किट चे वाटप करण्यात आले.
या किटला रमजान रेशन किट असे नाव देण्यात आले होते.रेशनिंग किट मध्ये तांदूळ, तेल, साखर, पत्ती, दाल, असे १३ पदार्थ व शिरखुरम्या साठी लागणारा सुखामेवा यासारखा पदार्थाचा समावेश होता. जवळपास ७० गरजू कुटुंबीयांना यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी अल्फा फाउंडेशन चे सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला.या तरुणाने घेतलेल्या पुढाकाराचं सर्वत्र कौतुक होत आहे..