ताज्या घडामोडी

मानवत शहारत जुगार अड्ड्यावर धाड

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

मानवत शहरातील उच्चभ्रू अशा गोदु गल्ली परिसरात शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करत 11 जुगार्यांना ताब्यात घेत त्यांचेकडून रोख रकमेसह एक लाख 70 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत या जुगाऱ्या विरुध्द मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी येथील सहायक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक विकास खोले, दीपक मुंडे ,सय्यद जाफर ,बंकट लटपटे, भागवत हुंडेकर, अनिल इंगळे, कपिल घोडके त्यांचे पथक अवैध धंद्या बाबत माहिती घेत असताना गस्त घालत होते या वेळी मानवत शहरात आले असता या पथकाला मानवत शहरातील गोदु गल्लीमध्ये काहीसं जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पथकाने कारवाई केली रोख 54 हजार 900 व मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असे मिळून एक लाख 70 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी मुंज दिलीपराव बोचरे, दीपक दत्तात्रय बारहाते , रामभाऊ हरिभाऊ वगदे, शेख असिफ शेख इसाक ,सुमित भारतराव चीमावार , संगमेश संजय भोगावकर ,प्रदीप अशोक धापसे ,शिवाजी दत्तात्रय वकील, अनिल रामकिसन डोईफोडे, अविनाश अंबादास होंगे व हनुमान मंत्री यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत मानवत शहारत सध्या बाजार्पेठ बंद चा फायदा घेत अशा प्रकारे जुगार अड्डे ठिकठिकाणी चालू असून स्थानिक पोलीस मात्र याकडे का दुर्लक्ष करीत आहेत या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळू शकले नाही.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close