अज्ञात वाहनाची पीक अप ला धडक

चालक किरकोळ जखमी
ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे जवळ अज्ञात वाहनाने पीक अपला समोरून जोरदार धडक दिल्याने पीकअप वाहनाचा समोरील भाग क्षतीग्रस्त झाला तसेच धडक बसल्याने वाहन चालक किरकोळ जखमी झाला आहे.वाहन चालकाचे नाव रिझवान शेख वय 32 वर्ष रा.चंद्रपूर असे असून सदर धडकेत त्यांना गुप्ती मार लागला आहे.
रविवारच्या रात्रौ 10 वाजता
अहेरी वरून चंद्रपूरला येत असतानाच नवेगाव जवळ समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात घडला.अपघात ग्रस्त
पीक अप वाहनाचा क्र mh 04 gf 4667 आहे.
चंद्रपूर हुन निघालेले एक अज्ञात वाहन अहेरी वरून निघालेल्या
पीकअप ला नवेगाव जवळ धडक दिली आणि पसारं झाल्याने त्या वाहनाचा शोध लागला नाही.
मात्र या धडकेत पीक अप वाहनाचा दर्शनी भाग क्षतीग्रस्त झाला आहे.

किरकोळ व गुप्ती मार लागुणही वाहन चालकाणे जवळच्या कोणत्याही दवाखान्यामध्ये प्राथमिक उपचार केला नाही आणि गोंडपीपरी पोलीस स्टेशन मध्ये या विषयी साधी माहिती पण दिली नाही.