ताज्या घडामोडी

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे खातेदारांना नाहक त्रास

ग्रामीण प्रतिनिधी : वृषभ कामडी मोटेगाव

चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेलले गाव, अवती भोवती दहा-बारा गावांची चांगली बाजारपेठ,परिसरातील एकमात्र राष्ट्रीयकृत बँक असल्या कारणाने या शाखेमध्ये बरीच ग्राहक असतात, येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे खातेदारांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे आणि विद्युत सुरळीत चालू ठेवण्यासाठी विद्युत जनित्र किंवा सौरऊर्जा चे कुठलेही उपकरणे नसल्याने ग्राहकांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे खातेदारांच्या मनात बँके प्रति असंतोष निर्माण झाला आहे.
सदर मोटेगाव येथील बँकेत मागील ६ ते ७ महिन्यापासून पासून विद्युत खंडित होत असल्याने खातेदारांना दिवसभर ताटकळत उभे राहावे लागले तर कधी काम पण होत नव्हते कारण संगणक प्रणाली व्दारे बँकेचे काम सर्वच बँक क्षेत्रात झाल्यामुळे आता विद्युत पुरवठा ला महत्व आहे आणि वेळेवर विद्युत पुरवठा खंडित होत असेल तर तात्काळ विद्युत जनित्र किंवा सौर ऊर्जा उपकरणे च्या माध्यमातून वीज पुरवठा केला जातो अनेक बँकेत ही सुविधा उपलब्ध आहे आणि बँकेतील कामकाज सुरळीत सुरू आहे परंतु मोटेगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत विद्युत ची आपातकालीन व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे खातेदारांना व ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे बँके प्रति ग्राहकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे तेव्हा संबंधित विभागाने जातीने लक्ष घालून विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी साधने उपलब्ध करून खातेदारांचा नाहक त्रास वाचवावे अशी मागणी या बँकेतील खातेदारांनी केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close