ताज्या घडामोडी

खेमजई येथे भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबीर संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी:देवानंद तुराणकर खेमजई

तालुक्यातील खेमजई येथे आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी (मेघे) ,ग्राम पंचायत खेमजई ,अक्षर अमृत बहुउदेशीय संस्था वरोरा व दिशा संस्था वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. शाळेच्या पटांगणात दिनांक 19 नोव्हेंबर 21 रोजी रोग निदान व उपचार शिबिर संपन्न झाले .शिबिराचे उदघाटन शिव सेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांनी केले तर शिबिराचे अध्यक्ष डॉ प्रमोद गंपावर उपस्थित होते. या शिबिराकरिता उद्योजक रमेश राजूरकर ,माजी जि .प.सभापती कन्हैय्यालाल जयस्वाल , पंचायत समितीचे सदस्य वंदना दाते ,पंचायत समिती सदस्य डॉ झाडे, दिशा कॉलेज चे प्राचार्य संदीप डाखरे ,माजी सरपंच सुरेश कुत्तरमारे , माजी सरपंच रमेश बावणे ,सरपंच मनीषा चौधरी, उपसरपंच चंद्रहास मोरे, पोलीस पाटील तुरणकार इ. मान्यवर उपस्थित होते.

शिबिरामध्ये मेडिसिन, नेत्ररोग, सर्जरी, स्री रोग, बालरोग, श्वसन रोग ,नाक कान घसा रोग,व त्वचा रोग इत्यादी विभागाचे तज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. शिबिरामध्ये 396 रुग्णांनी आपला उपचार मोफत करून घेतला यापैकी 75 लोकांना मोतीबिंदू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यांना सवलतीच्या दरात सावंगी रुग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्या वतीने परिसरातील आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचा कौटुंबिक आरोग्य कार्ड देऊन सत्कार करण्यात आला. शिबिरामध्ये डॉ. मिलशा फिलिप्स, डॉ. सुजल पटेल, डॉ. लोकेश वैष्णव,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर उमाटे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते नितीन गायकवाड इत्यादी तज्ञ उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रा. धीरज दारुंडे ,रमेश चौधरी, उपसरपंच चंद्रहास मोरे, योगेश कोहळे,धनराज गायकवाड, नथ्थुजी घरत ,शत्रुघ्न शेरकुरे,भगवंत ननावरे, अशोक दडमल,श्रवण लांडगे, सुरेश तपासे, रवि रणदिवे इ. सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close