ताज्या घडामोडी
नेरी येथे युवकाची आत्महत्या
प्रतिनिधी : सुदर्शन बावणे
दि. 4/6/24 ला सकाळी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान युवकाने आपल्याच बुलेरो पिक अप मध्ये जाऊन मागच्या बाजुने लाऊन असलेल्या दोराने गळफास लाऊन आत्महत्या केली . मृतकाचे नाव रमेश भाऊराव पिसे असुन वय अंदाजे 37 वर्ष आहे घटनेची माहीती चिमुर पोलीसांना देताच पोलीस घटनास्थळी पोहचले पोलीसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चिमुर येथे पाठविण्यात आले आत्महत्येचे कारण कळले नाही पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहेत .