प्रत्येक शाळा व महाविद्यालयात इलेक्टरोल लिटरसी(चुनाव पाठशाळा) स्थापन होणार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मतदारांमध्ये विशेषता भविष्याचे मतदाता व युवा मतदाता यांना मतदान साक्षरता करण्यासाठी इलेक्ट्रल साक्षरता क्लब प्रत्येक शाळेत व महाविद्यालयात चुनाव पाठ शाळा स्थापना करण्यात यावे व चुनाव पाठशाळेच्या माध्यमातून निवडणूक साक्षरता रोचक व मनोरंजक करण्यात यावी. प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी चुनाव पाठशाळा असेल व गाव समुदायाचे सर्व सदस्यांसाठी ही शाळा राहणार आहे. यात सर्व वयोगटातील व्यक्ती सहभागी असल्याने ज्या काही गतिविधी असेल ती सहज सोपी असेल व सर्व सदस्यांचा यात सक्रिय सहभाग असेल यात युवावर विशेष लक्ष दिले जाईल ज्यानी मध्येच शिक्षण सोडून दिले आहे.
ELC क्लब( चुनाव पाठशाळा) चे सदस्य कोण असणार
-शाळेतील इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी 14 ते 17 वर्षे वयोगटातील
-महाविद्यालयातील 18 ते 21 वयोगटातील युवक
ग्रामीण समुदाय गावातील सर्व सदस्य
चुनाव पाठशाळा कशासाठी?
१) मतदारांना ईव्हीएम व vp पॅड चा परिचय करून देणे व EVM सुरक्षित व्यवस्था आहे व या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पूर्ण इमानदारीने केली जाते
२) समूहाला त्यांचे मताची किंमत दाखवणार व आपले मताचा अधिकार विना दबावाने पूर्ण विश्वासाने व नैतिकतेने प्रयोग करण्यास त्यांची मदत करणे
३) सर्व सदस्यांचे मतदान करिता नावनोंदणी करणे ज्यांनी मतदानास पात्र असूनही अद्याप आपले नाव नोंदणी केली नाही .
४) असे विचार विकसित करणार की जास्तीत जास्त लोक चुनाव प्रक्रियेमध्ये सहभागी होतील व प्रत्येक वोट महत्त्वपूर्ण आहे व कोणी मतदाता मतदानापासून सुटनार नाही.
भारतीय निवडणूक आयोग व माननीय जिल्हा अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी परभणी यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार ई एल सी क्लब स्थापन करून नियमित माहिती पुस्तिका नुसार कार्यक्रम घेऊन त्याची प्रसिद्धी करण्याचे निर्देश श्री शैलेश लाहोटी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पाथरी यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातील सर्व बीएलओ व शाळांना दिले आहेत.