सोनेगाव काग रेती घाटावर अवैध रेती उत्खनन सुरूच
शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच खनिकर्म सदस्य अवैध रेती घाटावर पोहचून सुद्धा स्थानिक महसूल अधिकारी येतात एक तास उशिरा
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
चिमूर मुख्यालयापासुन अवघ्या 6 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनेगांव-काग प्रभागातील उमा नदीच्या पात्रातुन रेतीचा अवाढव्य उपसा करण्यात येत आहे, मागील तीन महिन्यापासून रेतीची चोरठी वाहतूक बेधडक होत असताना सुद्धा याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने महसूल विभागाचे अधिकारी यात सामिल आहे की काय असा सशय बळावला आहे,
तस्करानी सोनेगांव-काग उमा नदिवरिल रेती वर हल्लाबोल केला असून रेतीची चोरटी वाहतूक करण्यात येत आहे, या अवैध वाहतूकिमुळे पांदन रस्त्याची पूर्ति वाट लागली आहे, कार्यवाही टाळन्यासाठी रेती घाट ते चिमूर तहसील मुख्यालय पर्यन्त खबरे ठेवले आहे, तीन ते चार दिवसा आधी शिवसेना पदाधिकारी यानी रेती घाटावर धड़क दिली असता मजूर व ट्रक्टर असता व्यस्ता पळत होते, त्यानंतर रेती तसकरिला ब्रेक लागला होता या आधिही सोनेगाव काग रेती घाटावर भारतीय क्रांतीकारी सघंटनेकडून ऊपोषण करण्यात आले होते पन महसूल प्रशासन कोनतीच कार्यवाही करत नसल्यामुळे तस्कारांची मोजोरी पुन्हा पाहायला मिळत आहे, चिमूर तालुका शिवसेनेच्या वतीने दोन तीन वेळा रेती घाटावर धाड़ टाकून उपविभागय अधिकारी, तहसीलदार याना फोन वरुण महितिसुधा देण्यात आली, पन रेती तस्करावर प्रशासनाचा हात असल्यामुळे कोणतीच कार्यवाही झाली नसून प्रशासनाचे महसूल विभागाने वेळीच मुस्कया आवरल्या नाही तर शासनाचा करोड़ो रूपयाचा महसूल बुडल्या शिवाय राहनार नाही, रेती तस्कर एवढ्या प्रमाणात रेती चोरी करीत असताना प्रशाशन गप्प का, महसूल विभागाचे किती अधिकारी यात सामिल असतील याची सर्वत्र चर्चा होतानी दिसत आहे.