ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी पार्टीच्या आंदोलनाचा हाबाडा, महिनाभरात रस्ता करून देण्याचे आश्वासन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘रास्ता रोको’ आंदोलन आज यशस्वी रित्या पार पडले. मागील अनेक वर्षांपासून दयनीय अवस्थेत असलेला सेलू-पाथरी-सोनपेठ क्रमांक बी -५४८ राष्ट्रीय महामार्ग रखडलेला आहे. या संदर्भात अनेक तक्रारी आल्याने ‘रास्ता रोको’ आंदोलनाचा आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात निर्णय घेत आज पाथरी शहरातील सेलू कॉर्नर येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करून शेकडो आंदोलकांनी रस्ता अडवत लोकशाही मार्गाने आंदोलन केले. मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेल्या या आंदोलनाची धास्ती घेत संबंधित महामार्ग अधिकारी यांच्या वतीने एक महिन्याच्या आत रस्ता पूर्ण करून देण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले.
प्रामुख्याने रेणुका व लिंबा असे दोन कारखाने ५४८बी या राष्ट्रीय महामार्गावर येतात. त्यामूळे शेतकऱ्यांना ऊस नेण्यासाठी मोठी अडचण होत आहे. तसेच अनेक गावकऱ्यांना याचा त्रास होता, असंख्य खड्डे व वाहनांचे होणारे अपघात, याची गंभीर दखल घेऊन या आंदोलनाची दिशा ठरवली गेली. या संदर्भात काल बाजार समिती पाथरी येथील कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपण स्वतः या आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले होते. असे मत यावेळी बोलताना आ. दुर्राणी यांनी मांडले.
या अनुषंगाने सकाळी १० वा. या आंदोलनाला सुरुवात झाली होती.परिसरातील शेकडो कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी यावेळी सेलू कडे जाणारा रस्ता अडवत आंदोलन केले. यावेळी ‘रस्ता दुरुस्तीचे आश्वासन मिळाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही,’ ही भूमिका घेतली होती.राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याबाबत उपस्थितांना आश्वासन दिले. ‘पुढील १० दिवसांत या रस्त्याचे काम सुरू होईल व ते एका महिनाभरात पूर्ण करू,’ असे आश्वासन दिल्यानंतर ‘रास्ता रोको’ आंदोलन थांबवण्यात आले. लोकशाही मार्गाने आंदोलनाचा हाबाडा देत पाथरी- सेलू रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याने जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे जनतेतून विशेष कौतुक होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close