समाजसेवेचा आदर्श; बागवान फाउंडेशनकडून गरजू कुटुंबाला मदतीचा हात

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत शहरातील एका अत्यंत गरजू कुटुंबाला बागवान फाउंडेशनच्या वतीने जीवनावश्यक मदत करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या मानवत बागवान फाउंडेशनने पुन्हा एकदा माणुसकीचा आदर्श समाजासमोर ठेवला.

फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कुटुंबाची परिस्थिती जाणून घेत त्यांना आवश्यक त्या वस्तू व मदत सुपूर्द केली. यावेळी कुटुंबीयांनी बागवान फाउंडेशनचे मनापासून आभार मानले.
बागवान फाउंडेशन हे केवळ गरजू कुटुंबांनाच नव्हे, तर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि मानवसेवेच्या उपक्रमांमध्येही सातत्याने सहभागी होत असून समाजहिताचे कार्य करत आहे. भविष्यातही गरजू नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अशाच प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या मदत उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून, समाजातील सक्षम व्यक्ती व संस्थांनीही गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.









