कौतुकास्पद-नंदोरीच्या शिवसेनेना शाखा प्रमुखांनी वाचविले रुग्णांचे प्राण

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
भद्रावती तालुक्यातील नंदोरी या गावात बऱ्याच काही दिवसांपासून महादेव पचारे नावाचा इसम गंभीर आजारी होता. दिवसेंदिवस तो आजारी रुग्ण गंभीर झाला. त्या रुग्णांच्या कुटुंबाने सेवाग्राम येथील दवाखान्यात भरती केले.

डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्या रुग्णाला रक्ताची अत्यावश्यक होती हे नंदोरीचे शिवसेना शाखा प्रमुख तथा परीसरातील युवा नेतृत्व पवन एकरे यांना कळताच क्षणी त्यांनी तातडीने वर्धा जिल्ह्यातील शिवसेना समुद्रपुर तालुका व शहर अध्यक्ष यांच्याशी संपर्क करून रक्त गटाची चौकशी करून समुद्रपूरचे शिवसेना उपशहरप्रमुख सौरभ ठाकरे यांना फोन करून त्यांना रक्ताची तातडीची आवश्यकता असल्यास त्यांना भ्रमणध्वनी द्वारे सांगुन त्यांना हवी ती मदत करण्यासाठी विनंती केली. ठाकरे यांनी लगेचच होकार दिला व सेवाग्रामच्या दवाखान्यात जाऊन चौकशी करून त्या रुग्णाला तुरंत रक्ताचा पुरवठा करुन दिले. व आणखी काही मदत लागल्यास रुग्णांच्या कुटुंबांना एकरेना असे सांगुन रुग्णाची हिम्मत वाढविली व त्यामुळे महादेव पचारे यांचे प्राण वाचले. त्यामुळे संपुर्ण नंदोरी गावामध्ये नंदोरीचे शिवसेना शाखाप्रमुख पवन एकरे यांचे गावातील नागरिक कौतुक करत आहे. गावातील वडीलधारी व्यक्तींने असेच कार्य घडत राहो असा शुभआशीर्वाद दिला. यामध्ये मदतीचा हात म्हणून नंदोरीचे आकाश ढवळे, समुद्रपुरचे अक्षय मोरापे, गोलु मोहितकर. यांचेही यात मोलाचे योगदान लाभले.