ताज्या घडामोडी

बारा वर्षीय मुलीचे अपघातात जागीच मृत्यू तर ४० वर्षीय काका चे नागपूर ला नेताना वाटेत मृत्यू

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे

दिनांक ०१/१२/२०२० ला नागपूर वरून ताडोबा अभयारण्यातील कोलारा जवळील देवरी येथील वन्यविलास या रिसॉर्ट मध्ये ऑनलाईन बुकिंग करून ताडोबा जंगल सफारी करीता जात असतांना सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी चिमूर जवळील बांबू रिसॉर्ट पासून ५०० मिटर अंतरावरील तुकुमचा भडगा नाला मध्ये फोर्ड कंपनीची एन्डोव्हर कार पलटी झाली या अपघातात १२ वर्षीय सना अभिषेक अग्रवाल राहणार नागपूर जागीच मृत्यू झाला असून एस या आकाराचे वळणमार्ग असल्याने नव्याने रोडचे काम सुरू आहे. चालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटल्याने कार नाल्यात पलटी झाली यात मुलगी जागीच मरण पावली व दुसरे तिचे काका अमिनेश अशोक अग्रवाल वय ४० वर्षे यांना नागपूर येथे अँबूलन्सने उपचाराकरिता नेताना उमरेड जवळ वाटेत मृत्यू झाले.

तर या कार मध्ये चालक ज्ञानेश्वर वसंता नरड वय ३८ वर्षे सह मिनू अमिनेश अग्रवाल ३२ वर्षे , नेहा आशिष अग्रवाल वय ३६ वर्षे , ईशु अनिमेश अग्रवाल वय १७ वर्षे असे एकूण ६ जण होते.या सहा पैकी २ जनांचे मृत्यू झाले असून ४ जणांवर उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close