ताज्या घडामोडी

“गळफास “असलेली वाघीणीची तात्काळ चौकशी करा-कवडू लोहकरे

***वाघांच्या संवर्धनावर प्रश्नचिन्ह

***पाच महिन्यांचा कालावधी लोटुनही थांग पत्ता लागेना .

तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा तालुक्यातील सालोरी लगतच्या जंगलात पाच महिण्यापुर्वी मे महिन्यात २३ ला गळफास लागुण असलेली वाघीण कॅमेरात कैद झाली. 13 जुलै ला तिला शोधण्यासाठी शुटर, ताडोबातील पथक , वरोरा, भद्रावती वनविभाग यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली पण त्यांच्या पदरी निराशाच आली.वाघीणीचा शोध घेण्यासाठी 65 कॅमेरे तैनात करूणही वनविभागाला अपयश आले.वाघीणीला बेशुद्ध करण्यासाठी शुटर व उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व जलद बचाव पथकाच्या माध्यमातून भर पावसात शोध घेणं सुरू केलं पण 11जुन ते 19 जुन या कालावधीत वाघीणीचा पत्ता लागेना.त्या वाघीणीचे पोट फुगुण असल्याने ती वाघीण गर्भवती असल्याची शक्यता वरोरा येथील वन्यजिव प्रेमींनी व्यक्त केली. 27 मे ला वाघीण कॅमेरात कैद झाली.पण त्यानंतर कोणालाही वाघीण नजरेत आली नाही. वाघीणीला पकडण्यासाठी चक्क बकरी सुद्धा ठेवण्यात आली पण पुन्हा त्यांच्या पदरी निराशाच आली.19 जुन ला रेस्क्यू टिम निराश होऊन माघारी परतली .

कोणीतरी शिकार करण्याच्या प्रयत्नातुन वाघीणीच्या गळ्यात फास अडकला असावा असा संशय आहे.कॅमेराच्या छायाचित्रा वरुण फासामुळे गळा आवळला जात आहे.त्यामुळे गळ्याला ईजा होऊ शकते. जर ती गर्भवती असेल तर एका सोबत नविन येणाऱ्या बछड्यांना सुद्धा धोका पोहोचू शकतो.पाच महिण्यांचा कालावधी लोटुनही वनविभागाला वाघीण शोधण्यास अपयश आले.पाच महिन्यांपासून वाघीणीचा मृत्यू झाला की बेपत्ता ? यावर मोठ्या प्रमाणात संशय निर्माण होत आहे त्यामुळे वनविभागाने तपासाची चक्रे वेगाने फिरवुन या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी .अशी मागणी पर्यावरण प्रेमी कवडू लोहकरे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

“” पाच महिन्यांपासून वाघीण मरण पावली कि बेपत्ता आहे याबाबत शंका निर्माण झाली आहे.वाघांच्या संवर्धनावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.वाघीण शिकार करू शकत नाही .मृत्यूची शक्यता बळावली आहे चौकशी व्हायला पाहिजे.

कवडू लोहकरे
पर्यावरण प्रेमी

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close