ताज्या घडामोडी

राष्ट्र सेवा दल चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्षपदी रावन शेरकुरे,जिल्हा संघटकपदी विलास फलके यांची निवड

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

राष्ट्र सेवा दल चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची सभा वसंत भवन,चंद्रपूर येथे संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी सुरेश डांगे होते.या सहविचार सभेत राष्ट्र सेवा दल चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी २०२२ ते २०२५ या कालावधीकरिता गठीत करण्यात आली.जिल्हा कार्याध्यक्षपदी रावन शेरकुरे(चिमूर)तर संघटकपदी विलास फलके(चंद्रपूर)यांची निवड या सभेत करण्यात आली.राज्य मंडळ सदस्यपदी सुरेश डांगे(चिमूर),नंदकिशोर शेरकी(मूल),माधुरी डोंगरकर(वरोरा),प्रज्वल कन्नाके(मूल) यांची निवड करण्यात आली.


राष्ट्र सेवा दल जिल्हा कार्यकारिणीत रंजना तडस(चंद्रपूर),जब्बार शेख(राजूरा),क्रिष्णा बावणे(मूल),राजेश धोंगडे(ब्रम्हपुरी),निर्मला सोनवने(नागभीड),विजय मिटपल्लीवार(सावली) यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.नवनियुक्त पदाधिका-यांचे राष्ट्र सेवा दल कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील,राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख,प्राथमिक शिक्षक भारती राज्याध्यक्ष नवनाथ गेंड,राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे,विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे,प्रकाश ब्राम्हणकर,पूर्ण वेळ कार्यकर्ते इम्रान कुरेशी आदींनी अभिनंदन केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close