ताज्या घडामोडी

वरोरा तालुक्यातील महाडोळी रस्त्यावर झाडे लावुन निषेध

तालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा येथून जवळच असलेल्या महाडोळी मार्गावर खड्डे पडल्यामुळे नागरिक त्रस्त आहे . या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे . रस्त्याची दुरवस्था झाली असताना प्रशासनाचे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे झाड लावुन निषेध करण्यात आला . व या गेंड्याच्या कातडीचे प्रशासनाला जाग आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.
महाडोळी वरून माढेली ला जाण्यासाठी हा रस्ता जातो . मात्र या रस्त्यावर मोठें मोठें खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे . लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे . पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे खड्डाचां अंदाज समजत नाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे . लवकरात लवकर खड्डे बुजविण्यात यावे. अशी विनंती अभिजित कुडे यांनी केली अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला . यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे , रोशन भोयर, विजय कुडे, विनोद कोठारे, ऋषिकेश पाटील, पंकज मांडवकर, ऋषिकेश कुडे , दीपक कुडे , साहिल पानतावणे उपस्थीत होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close