ताज्या घडामोडी

संत गाडगेबाबांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगीकार केला तरच मानवी जीवन समृद्ध होईल-समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

संत गाडगेबाबा यांनी अवतीभवती चा माणूस वाचला सामाजातील विषमता शोधली मानवी जीवनाचे सूक्ष्म परीक्षण केले व अज्ञानाच्या ,जाती धर्माच्या शिक्षणापाशुन मूलबाळाना वंचीत ठेवणाऱ्या अंधश्रद्धा बाळगणाऱ्या समाजाला प्रभोधन, कीर्तन करून जातीपातीचे पिंजरे तोडा,मुलांना शिकवा, चमत्काराला कडाडून विरोध करत धाग्या दोऱ्याच्या नादि लागु नका कर्ज काढू नका असे सांगत गाडगेबाबाना खेड्यात खूप मोठी विषमता दिसली आणि त्याना आपले ध्येयच सापडले हातात स्वतः झाडू घेऊन स्वच्छतेचे महत्व सांगत सोबतच लोकांच्या मनातील घाण संकुचित विचार प्रश्न विचारून काढत संत गाडगेबाबा च्या कर्तृत्ववाचा परीघ हा आभाळा एवढा होता आकाशाला मंडप व जमिनीला गोधडी करून उंच आकाशात विचारांची देवाणघेवाण करून जगाला उजेडाची वाट दाखवणारे संत गाडगेबाबा साधी अक्षर ओळख नसणाऱ्या माणसाने विषमतेवर बोलावे व त्यांच्या नावाचे विद्यापीठ व्हावे हेच त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे पण आजही मोठं मोठी माणसे ढोंगीबाबांच्या जाळ्यात अडकतात तेव्हा ही मानशे किती खुजी वाटतात म्हणून संत गाडगेबाबाच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विचारांचा अंगीकार जोपर्यंत सर्वजण करणार नाही तोपर्यंत संपूर्ण समाज हा समृद्ध होणार नाही असे ड्रा बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनि सविधांन साक्षर ग्राम मालेवाडा येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या यावेळी कार्यक्रमाचे अद्यक्ष मालेवाडा ग्रामपंचायतचे सरपंच कालिदास भोयर,ग्रामपंचायत सदस्य, रेखा वरखेडे, शारदा मेश्राम, रेखा चौधरी, राशिका चौधरी, वर्षा दोडके, आदि उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन अंगणवाडी सेविका ललिता वरखेडे यांनी केले तर आभार अंगणवाडी सेविका रसिका चौधरी यांनी मानले यावेळी ग्राम स्वच्छता राबवून गावातील सर्व परिसर स्वछ करण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close