ताज्या घडामोडी

चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचा दणका

कोतवाला नंतर पंचायत समितीचा कंत्राटी अभियंता स्वप्निल निमगडे अडकला ACB च्या जाळ्यात.

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

घरकुलाच्या बांधकामाची रक्कम देण्यासाठी लाचेची मागणी करणा-या चंद्रपूर पंचायत समितीचा एका कंत्राटी अभियंत्याला काल शुक्रवार दि.२१जूलैला लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले .या लाचखोर अभियंताचे नांव स्वप्निल बबन निमगडे असल्याचे समजते. चेक निंबाळा येथील तक्रारदाराचे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले होते.त्यास या आधी दोन हप्ते प्राप्त झाले होते.पण तीसरा हफ्ता देण्यासाठी तक्रारदारास पंचायत समितीचा गृहनिर्माण कंत्राटी अभियंता स्वप्निल निमगडे यांनी चक्क पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती .नंतर हा सौदा दोन हजार रुपयांत पक्का झाला. परंतु ही रक्कम देण्याची चेक निंबाळा येथील तक्रारदाराची मुळीच इच्छा नव्हती. शेवटी त्यांनी चंद्रपूर स्थित लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले व या लाचखोराची रितसर तक्रार नोंदविली . कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता लाचखोराने लाच मागितल्याचे दिसून आले .त्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने काल या लाचखोरास दोन हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची अद्याप या बाबतीत सखोल चौकशी सुरू आहे . सदरहु कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक मंजूषा भोसले ,चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक जितेन्द्र गुरनूले , एसीबी पथकातील कर्मचारी रोशन चांदेकर ,नरेशकुमार नन्नावरे, संदेश वाघमारे, मेघा मोहुर्ले , सतिश शिडाम आदींनी यशस्वीरित्या केली.उपरोक्त घटनेने चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.लाच घेणे व देणे हा कायद्याने गुन्हा आहे .याची पूरेपूर खात्री व जाणीव असतांना देखिल या लाचखोर अभियंताला लाचेचा मोह टाळता आला नाही.एसीबीने केलेल्या या कारवाईचे जनतेंनी स्वागत केले आहे.एक आठवड्यापूर्वी कोरपना तालुक्यातील एका कोतवालास याच पथकाने दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते हे सर्वश्रुतच आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close