ताज्या घडामोडी

लोकशाहीर अन्नाभाऊ साठे जयंती साजरी

मातंग समाजानि पारंपरिक व्यावसायावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर होन्याची गरज

  • श्रीहरी सातपुते

शहर प्रतिनिधी : संजय दडमल नेरी

मातंग समाजातील युवकांनी व्यसनाधीन न होता समाज जागृतीचे कार्य केले पाहीजे समाजातील शिक्षीत युवकांनी सरकारच्या सामाजीक योजना वंचीत घटकापर्यत पोहचविन्याचे कार्य केले पाहीजे यासाठी शिवसेना सर्व तो परी मदत करत आहे मांतग समाजाने पारंपारीक व्यावसायावर अवलंबुन न राहता स्वयं रोजगाराची निवड करून आत्मनिर्भर होन्याची गरज असल्याचे मातंग समाजाला मार्गदर्शन करताना शिवसेना चिमूर तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते लोकशाहीर अन्नाभाऊ साठे जंयती कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होतेबहुजनांच्या वेदनाना सहित्यातून वाचा फोड़नारे आणि कष्टाच्या हक़्क़साठी झगड़नारे लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांची एकसे एकवी जयंती नेरी येथील अन्नाभाऊ साठे स्मारकात रवीवार ला पार पडली हा कार्यक्रम अन्ना भाऊ साठे स्मारक समिती च्या वतीने घेन्यात आला दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाच्या समताहुन प्रज्ञा राजुरवाडे यानी मातंग समाजाच्या विवीध योजनाची माहीती दिली
लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या फ़ोटोला दीपप्रज्वलन करुण झेंडा वंदन करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष चिमूर शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते होते, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि मातंग समाज जिल्हाध्यक्षा माधुरी खंडारे, डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजुरवाड़े, माजी ग्राम पंचायत सदस्य किशोर उकुंडे, सिंदेवाहि तालुका अध्यक्ष गणेश खडसे, माजी ग्राम पंचायत सदस्य देवका शेंडे, नांदेड़ जिल्ह्या समन्वयक राहुल येळके आदी मंचावर उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन सुर्दशन बावने यानी केले, प्रस्ताविक देवानंद बावने, आभार प्रीतम डोंगरे यानी व्यक्त केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close